मुंबई

दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस अटक; ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेची कारवाई…

thane – दरोडाच्या गुन्हयातील मुख्य पाहिजे आरोपीस खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नालासोपाऱ्यातून अटक केली. खालीद मुज्जमील अली उर्फ निग्रो असे याचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेचे पोलीस मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग करीत असताना मुंब्रा पोलीस स्टेशन गु.र.नं. 1122/2026 भा.न्या.संहिता 2023 चे कलम 310(2), 312, 308(3), 308(4), 308(5), 303(2), 324(4)(5), 115(2), 351(2), 351(3), 352, 61(2), सह शस्त्र अधि. 4,25 सह म.पो.अधिनियम 37(1),135 प्रमाणे या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी खालीद मुज्जमील अली उर्फ निग्रो हा नालासोपारा येथे त्याच्या बहिणीच्या घरी राहत असल्याची माहिती पोशि रोहन म्‍हात्रे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन खालीद मुज्जमील अली उर्फ निग्रो याला नालासोपाऱ्यातून अटक केली. दरम्यान, पुढील कारवाई करीता आरोपीला मुंब्रा पोलीस स्टेशमध्ये जमा करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, (खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/हेमंत राणे, पोशि/रोहन म्हात्रे, चापोहवा/भगवान हिवरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page