kalyan

KDMC तील लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात…

kalyan – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील मालमत्ता कर विभागातील एका लिपिकाला सहा हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

सिद्धार्थ बोराडे असे या लिपिकाचे नाव असून, तो बी वॉर्ड कार्यालयातील मालमत्ता कर विभागात काम करतो. या प्रकारानंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील लाचखोर कर्मचाऱ्यांची संख्या आता थेट ५० वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे घरपट्टीचे काम रखडले होते. ते मार्गी लावण्यासाठी कर विभागातील लिपिक सिद्धार्थ बोराडे याने सहा हजार रूपयांची मागणी केली होती.

सदरबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्याप्रमाणे एसीबीने तपास करून, सापळा रचून सिद्धार्थ बोराडे याला सहा हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page