मुंबई

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही – मुख्यमंत्री…

mumbai – युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा तुटवडा आहे, यामुळे आता राज्यात लॉकडाऊन लागेल अशा अफवा सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे या विषयी कोणतीही अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल.

तसेच अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल. त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसवरू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार.

सध्या कोणतीही टंचाई नाही. भारताकडे सुमारे एका महिन्याचा पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास पुरवठा आणि मागणी यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि कृत्रिम टंचाई उद्भवू शकते. त्यामुळे नेहमीप्रमाणेच इंधन भरावं, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे १० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page