मुंबई

PNG पाईप लाईनसाठी अर्ज करा; अन्यथा – भुजबळ…

mumbai – पाईप गॅस सुविधा (पीएनजी) उपलब्ध असलेल्या परिसरातील नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत PNG गॅस पाईप लाईनसाठी अर्ज करा, अन्यथा भविष्यात LPG गॅस बंद होऊ शकतो, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

भुजबळ म्हणाले की, ज्या भागात पीएनजी कनेक्शन घेणे शक्य आहे, तिथे घरगुती किंवा व्यावसायिक वापरासाठी तीन महिन्यांच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे. पीएनजी विस्तारासाठी विविध कंपन्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असून, अर्ज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे किंवा संबंधित कंपनीकडे करता येईल. यासाठी नियम शिथील करण्यात आले असून, पाइपलाइन मंजुरी २४ तासांत मिळेल आणि बिल्डरांना नवीन इमारतींसाठी ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) देण्यासाठी पीएनजी अनिवार्य केला जाईल.

तसेच पीएनजीसाठी अर्ज केला असला तरी एलपीजी बंद होणार नाही. मात्र, सुविधा उपलब्ध असूनही अर्ज न केल्यास एलपीजी पुरवठा थांबवला जाऊ शकतो. ही कारवाई आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत असून, युद्धजन्य संकट टाळण्यासाठी आहे. नवीन इमारतींमध्ये पाणी-वीजाप्रमाणे पीएनजी अनिवार्य करण्याची शिफारसही त्यांनी केंद्राकडे केली आहे. असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page