kalyan

कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला…

kalyan – कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला असल्याची घटना घडली आहे. या घटनेत चौघांना मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले आहेत. तसेच ढिगाऱ्याखाली देखील काहीजण अडकले आहेत.

श्री सप्तश्रृंगी असं या इमारतीचं नाव असून, कल्याण पूर्वेतील मंगलराघो नगर परिसरात हि इमारत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वत मंगलराघो नगर परिसरात सप्तशृंगी नावाची ४ मजली इमारत आहे. आज दुपारच्या सुमारास अचानक या इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला तो थेट तळमजल्यापर्यंत येऊन धडकला. आणि यात ३ महिला आणि एका दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page