हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात…

mumbai – विधींमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू झाले असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बेड्या घालून विधान भवनात प्रवेश केला. त्यावेळी आव्हाडांनी हातात बेड्या का घातल्या आहेत असा प्रश्न अनेकांना पडला.

त्यावेळी प्रसारमाध्यमांनी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय, व्यक्त होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जातायत, ती पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे. प्रत्येकाला व्यक्त होता आलंच पाहिजे. बोलणे, व्यक्त होणे हे आमचे मूलभूत अधिकार आहेत. आम्हाला व्यक्त होता येत नाहीये म्हणून मी या बेड्या अडकवून आलो आहे.
या बेड्या यासाठी पण आहेत की, अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत. तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगत आहेत ते या बेड्यांपेक्षा कमी नाहीत. म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत. मला सर्वांना एकच सांगायचं आहे की अमेरिकेविरोधात आवाज उठवा. अमेरिकेला घाबरण्याची गरज नाही. अमेरिका आपली बाप नाही, असेही आव्हाड म्हणाले.