मुंबई
राजन साळवींचा उपनेते पदाचा राजीनामा…

mumbai – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. अखेर ते ठाकरे गटातून बाहेर पडले.
दरम्यान, राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.