बदलापुर : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार…

mumbai – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालात अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
अक्षय शिंदेने पोलिसांकडून बंदुक हिसकावून घेतली आणि गोळीबार केला असा दावा पोलिसांनी केला होता. पण या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसेच आढळले नाहीत असे तपासात निषपन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी पाच पोलिसांनी दोषी ठरवण्यात आले आहे. या पाचही पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
माहितीनुसार, ठाणे दंडाधिकारी चौकशी अहवालात या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचे न्यायालयाने नोंदवलं आहे. तसेच अहवालानुसार पोलीस परिस्थिती सहज हाताळू शकले असते, त्यांनी बळाचा वापर करणे योग्य ठरू शकत नाही. त्यामुळे न्यायालयाने या पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.