महाराष्ट्र
अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग…

अहमदनगर – आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात हि घटना घडली, रेल्वेच्या तीन ते चार डब्यांना आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.