kalyan

खून करणाऱ्यांना कल्याण गुन्हे शाखेने केली अटक…

कल्याण – कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करणाऱ्यांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. तसेच एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. रूपेश कांबळे आणि मोहन बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत.

कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुचक नाका, कल्याण पूर्व येथे सुरज हिलम याला ६ जणांनी मिळून मारहाण करून त्याला जिवे ठार मारले होते. याबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण पूर्वेतील सुचक नाका, रिक्षा स्टॅन्ड जवळून रुपेश आणि मोहनला अटक केली तसेच एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत मोहनच्या मामास सुरजने दारू प्यायला बसले असताना उसने घेतलेल्या पैशांच्या देण्या-घेण्यावरून मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून त्यांनी सूरजला जीवे ठार मारले असल्याचे सांगितले.

सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व  निलेश सोनावणे सहा. पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि/संदिप चव्हाण, पोहवा/दत्ताराम भोसले, पोहवा/अनुप कामत, पोहवा/किशोर पाटील, पोना/दिपक महाजन, पोना/सचिन वानखेडे, पो.कॉ. मिथुन राठोड, पो.कॉ. विनोद चन्ने, पो.कॉ. गुरुनाथ जरग, पो.कॉ. गोरक्ष शेकडे, पो. कॉ. रविंद्र लांडगे, चालक पोहवा/अमोल बोरकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page