मुंबई

संजय निरुपम यांनी दिला काँग्रेस पक्षाचा राजीनामा…

मुंबई – काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने याआधी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर आता निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनाम दिला आहे.

निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना खरगे यांना पत्र लिहिले आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात असलेला मी निर्णय घेत आहे. मी आज माझ्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा. खूप खूप धन्यवाद, असं निरुपम आपल्या पत्रात खरगे यांना उद्देशून म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page