डोंबिवली

कल्याण डोंबिवली परिसरात लॉटरी माफिया शंकर अहुजाच्या अवैध ऑनलाईन लॉटऱ्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जोमात सुरु…

kalyan – कल्याण डोंबिवली म्हणाले का काही ना काही धंदा करण्यासाठी मोकळी जागा गिऱ्हाईक भरपूर असल्यामुळे अनेक दोन नंबरचे धंदे या कल्याण डोंबिवली शहर आणि परिसरात चालू आहेत. पण कल्याण डोंबिवलीतील स्थानिक पोलीस या अवैध, दोन नंबरच्या धंद्यांकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. गेल्या १ महिन्यांपासून कल्याण डोंबिवली शहर आणि परिसरात अवैध ऑनलाईन लॉटऱ्या जोरात सुरु आहेत. दिवस रात्र या लॉटऱ्याच्या दुकानात सामान्य माणसांची गर्दी पाहायला मिळते.

लॉटरी माफिया शंकर अहुजा याने स्वतःचा अ‍ॅप तयार करून ऑनलाईनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लॉटरीचा गोरख धंदा कल्याण डोंबिवली परिसरात सुरू केला आहे. या बदमाशाकडून एकीकडे सरकारचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवला जात आहे. तर दुसरीकडे लॉटरीच्या माध्यमातून केवळ माफियांनाच फायदा होत असल्याने लॉटरी खेळणारी अनेक कुटुंब देशोधडीला लागत चालली आहेत.

राज्यात ऑनलाइन लॉटरीवर बंदी असतानाही, डोंबिवलीतील राम नगर, टिळक नगर, विष्णू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर कल्याणमध्ये बाजारपेठ, महात्मा फुले, खडकपाडा, कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध ऑनलाइन लॉटरी सेंटर सुरू आहे. या लॉटरी सेंटर गेल्या महिन्यात सुरु झाल्या आहेत. या अवैध ऑनलाईन लॉटऱ्या सुरु असल्याची सर्व माहिती कल्याण डोंबिवलीतील स्थानिक पोलिसांना माहिती आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा अवैध व्यवसाय सुरू आहे. तरीही स्थानिक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी या अवैध ऑनलाइन लॉटरी संदर्भात पोलिसांना माहिती देऊनही पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. हे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते वारंवार ठाणे, कल्याण कंट्रोलला कॉल देऊन या अवैध ऑनलाइन लॉटरी संदर्भात तक्रार करतात आणि ज्यावेळी स्थानिक पोलीस या अवैध ऑनलाइन लॉटरीच्या ठिकाणी जातात त्यावेळी त्यांना तिथेच काहीच दिसत नाही. आणि मग हे पोलीस ठाणे, कल्याण कंट्रोलला अवैध ऑनलाइन लॉटरी सारखा कोणताही प्रकार इथे चालू नसल्याचे कळवतात. एकीकडे शासन ऑनलाइन लॉटरी आणि जुगारावर बंदी घालून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे स्थानिक पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई करत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अवैध लॉटरी चालवणारा चालक मालक माफिया शंकर अहुजा ला हे स्थानिक पोलीस पाठीशी घालत आहेत, लॉटऱ्याचा धंदा करण्यासाठी खुलेआम मदत करत आहेत. जणू काही अवैध लॉटरी सेंटर चालवणाऱ्या शंकर अहुजा याने पोलिसांना पगार देऊन कामावर ठेवले आहे.

दिवसरात्र चालणाऱ्या या लॉटरीच्या नादात अनेक तरुण, नोकरदार, बिगारी काम करणारे, नशेच्या आहारी गेलेली लोक कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई या जुगारात गमावत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे गृहमंत्री, महसूल मंत्री, आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी तातडीने लक्ष घालून, या अवैध लॉटरी सेंटर चालवणाऱ्या चालक मालक शंकर अहुजा याच्यावरती ताबडतोब कारवाई करावी तसेच यामागे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

( कल्याण डोंबिवली परिसरात या अवैध लॉटरी सेंटर चालवण्यासाठी स्थानिक पोलीस विभागातील कोणते पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मदत करत आहेत याबाबतची सर्व माहिती पोलिसांचे नाव आणि पद सहित पुढील बातमीत प्रसारित करण्यात येईल. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page