kalyan
कल्याणमध्ये माजी नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल…
कल्याण – कल्याणच्या माजी नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमधील भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज राय यांनी लग्नाचे वचन देत शारीरिक संबंध ठेवले तसेच महिलेने लग्नासाठी तगादा लावल्याने तिला त्रास देण्यात आला त्यामुळे या नाहक त्रासाला कंटाळून सदर महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोळसेवाडी पोलीस तपास करत आहेत