kalyan
कल्याणमध्ये १२ हजारांची लाच घेताना सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात…
कल्याण – १२ हजरांची लाच घेणाऱ्या कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. राज कोळी असे याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी राज कोळी याने तक्रारदाराकडे २४ हजारांची मागणी केल्यानंतर तडजोडअंती ही रक्कम १२ हजार रुपये ठरली. त्यानंतर राज कोळी याला कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात १२ हजार रुपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले. तसेच एका खाजगी इसमाला देखील एसीबीने ताब्यात घेतले आहे.