डोंबिवली

कल्याण डोंबिवली पालिकेतील सहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी बदली…

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शासन सेवेतील ३ सहाय्यक आयुक्तांची त्यांच्या प्रभागातून आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी तडकाफडकी बदली केली आहे. स्नेहा करपे, सोनम देशमुख, प्रीती गाडे अशी यांची नावे असून, स्नेहा करपे ह प्रभागात, सोनम देशमुख ग प्रभागात क्षेत्र तर प्रीती गाडे अ प्रभागात कार्यरत होत्या.

परंतु अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ज्यांची चौकशी करायला पाहिजे त्यांची चौकशी करत नाहीत. आणि जिकडे कारवाई करायला पाहिजे तिकडे करत नाही अशी देखील लोकांमध्ये चर्चा आहे.

पोलीस बंंदोबस्त मिळत नाही, अनिधकृत बांधकाम आहे परंतु लोक राहत आहेत, पोलीस बंदोबस्त मिळाला की कारवाई करू अशी कारणे तक्रारदारांना देऊन कारवाईस टाळाटाळ करत असल्याच्या अनके तक्रारी येत असल्याने याची दखल घेत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी त्यांची बदली केली असल्याची चर्चा प्रभागातील लोकांमध्ये चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page