महाराष्ट्र
आमदार अनिल बाबर यांचे निधन!…
सांगली – शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, अनिल बाबर यांचा सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास राहिला असून, पश्चिम महाराष्ट्रात त्यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी देखील त्यांची ओळख आहे.