ठाणे
२ लाखांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात…
भिवंडी – नारपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना २ लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, खुनाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी हि लाच घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रादार यांचा मुलगा भादंवि कलम ३०२ मध्ये अटक असून सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि शरद पवार हे असून त्यांनी सदर अटक आरोपीस सर्व प्रकारे मदत करतो व चार्जशीट पाठविताना सुद्धा मदत करतो असे सांगून ५ लाख रु. लाचेची मागणी करून तक्रारदारांकडून नारपोली पोलीस ठाण्यात त्यांच्या केबिनमध्ये २ लाख रुपये लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.