डोंबिवली
लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू…

डोंबिवली – धावत्या लोकलमधून पडून एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोपर ते दिवा रेल्वेस्थानकादरम्यान २९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास हि घटना घडली असून, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिया राजगोर असे या तरुणीचे नाव आहे. ठाण्याला एका खासगी कंपनीत ती नोकरीला जात होती. नेहमीप्रमाणे तिने डोंबिवली रेल्वेस्थानकातून मुंबई दिशेला जाणारी जलद लोकल पकडली होती. लोकलमध्ये गर्दी असल्याने दरवाजाजवळ उभे असलेल्या रियाचा गर्दीच्या रेट्याने कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान तोल गेला. आणि लोकलखाली पडून तिचा दुर्देवी मृत्यू झाला.