डोंबिवली

डोंबिवलीत चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी…

डोंबिवली –  चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने रोख रक्कम चोरी केली असल्याचा प्रकार डोंबिवली पूर्वेत घडला आहे. सदरबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अक्षय उर्फ सोनू किशोर दाते आणि रोहीत अनिल भालेराव अशी या दोघांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, हर्षद सरवदे हे डोंबिवली पूर्व येथे चहा पित असताना त्यांच्या ओळखीचा अक्षय उर्फ सोनू दाते व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून  सरवदे यांना ‘तु मला काळया का म्हणालास’ असे बोलून त्यांच्याशी भांडण करून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांना मारहाण केली. त्यानंतर या तिघांनी चाकूचा धाक दाखवून सरवदे यांचे २६००/- रूपये रोख रक्कम जबरीने काढून घेतले होते.

त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करत गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे डोंबिवली पूर्वेतील प्रगती कॉलेज जवळ सापळा रचून अक्षय उर्फ सोनू किशोर दाते आणि रोहीत अनिल भालेराव या दोघांना अटक केली.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक – ३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पो.निरी. राहुल मस्के, सहा.पो.निरी. संतोष उगलमुगले, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पोहवा अनुप कामत, पो. हवा.बापुराव जाधव, पो.ना. सचिन वानखेडे, पो.ना. दिपक महाजन, पो.कॉ. रविंद्र लांडग यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page