मुंबई

…अन्यथा छगन भुजबळांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करावी – संभाजीराजे छत्रपती.

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जालना येथील ओबीसी मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून संभाजीराजे छत्रपती संतापले असून, छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, तसेच इतर काही मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्यावतीने जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव या महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला असून, संभाजीराजे यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबतची पोस्ट केली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले कि, छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page