एटीएम मशीन मधून पैसे चोरणाऱ्याला अटक…
कल्याण – एटीएम मशीन मध्ये छेडछाड करून पैसे चोरणाऱ्या एका सराईत इसमाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. सुनील वर्मा असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, एटीएम मशीनची छेडछाड करून पैसे चोरून फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत असताना, पोलीस हवालदार प्रेम बागुल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व.पो.निरी सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन टीमचे, API नवनाथ रुपवते , पो.हवा पावशे, सचिन साळवी, परमेश्वर बाविस्कर, प्रेम बागुल, रवी भालेराव, पोलिस् नाईक चिंतामण कातकडे, अरुण आंधळे, रामदास् फड, यांनी सापळा रचून सुनील वर्मा यास अटक करून त्याच्याकडून १ मोटरसायकल आणि एटीएम मशीन मधून चोरलेली रक्कम हस्तगत केली.
दरम्यान, पुढील तपास पीएसआय मोरे आणि पोलीस नाईक चिंतामण कातकडे हे करत आहेत.