मुंबई

सिद्धीविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती…

मुंबई – श्री. सिद्धीविनायक मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष होते. आता या पदी सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जुलै २०१७ मध्ये आदेश बांदेकर यांची श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. जुलै २०२० मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर पुन्हा त्यांची अध्यक्षपदी पुर्ननियुक्ती करण्यात आली होती. तो कार्यकाळ जुलै २०२३ मध्ये संपला होता. तेव्हापासून ते प्रभारी म्हणून सिद्धीविनायक मंदिर न्यासच काम बघत होते. दरम्यान, आता या पदावर सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page