ठाणे

अट्टल सोनसाखळी चोरांना अटक…

ठाणे – अट्टल सोनसाखळी चोरांना गुन्हे शाखा घटक-२ भिवंडी पोलिसांनी अटक करून एकूण १३ लाखांचा ऐवज हस्तगत केला. मोहझम नवाज शरीफ अन्सारी आणि नियाज अहमद हुसेन शेख अशी या दोघांची नावे आहेत.

पोलीस पेट्रोलींग करत असताना, साईबाबा मंदिरा समोरील रोडवर कल्याण बाजूकडून भिवंडी बाजूकडे जाणाऱ्या रोडवरून एका मोटार सायकलवरून हे दोघे जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी भिवंडी शहरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.

सदर प्रकरणी पोलिसांनी एकूण १४ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोटार सायकल आणि इतर ऐवज असा एकूण १३,००,०००/- रु. किंमतीचा ऐवज हस्तगत केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page