मुंबई
पतीने केली पत्नीची हत्या…
मुंबई – पत्नीवर चाकूने वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. सदर प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. संतोष मिस्त्री असे पतीचे नाव आहे. तर नमिता संतोष मिस्त्री असे पत्नीचे आहे.
दोघांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच अडचणी असल्यामुळे दोघांचे एकमेकांसोबत पटत नसे. संतोष मिस्त्री घरी आला असता त्याची पत्नीसोबत बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर भांडणात झाले व याच भांडणाचा राग मनात धरून संतोष मिस्त्री याने त्याची पत्नी नमितावर चाकूने वार केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नमिताला रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. सदर प्रकरणी पोलिसांनी संतोष मिस्त्रीला अटक केली.