कल्याणमध्ये गांजा विक्री करणारा अटकेत…

kalyan – कल्याण पश्चिम परिसरात गांजा हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकास खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण रेड्डी असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून १ हजार १२३ ग्रॅम वजनाचा गांजा पकडला.
कल्याण पश्चिमेतील बंदरपाडा, मोहन रोड, कृष्णा किराणा स्टोअर्सच्या बाजूला एका इसम गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषांगाने पोलिसांनी सदर ठिकाणाहून सापळा रचून लक्ष्मण रेड्डीला अटक केली आणि त्याच्याकडून गांजा जप्त केला.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वपोनिरी डॉ.अमरनाथ वाघमोडे पोनि शिवले, (गुन्हे), सपोनि विजय गायकवाड पोउपनि व्ही.आर.भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल गुजर आणि पोनि साबळे (बाजारपेठ पो.स्टे.), Psi चव्हाण (डोंबिवली पो.स्टे.) यांनी केली आहे.