मुंबई
मुंबईतील धारावीत भीषण आग…

मुंबई – धारावी परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. धारावी परिसरातील काळा किला येथे असलेल्या अशोक मिल कंपाऊंडमधील तीन मजली आणि चार मजली इमारतींना पहाटेच्या सुमारास आग लागली.
या आगीत ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरु केले.
दरम्यान,आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.