महाराष्ट्र

भीमाशंकर मंदिर ३१ मे पर्यंत बंद…

pune – श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ३१ मे पर्यंत बंद राहणार आहे. नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विकासकामे सुरू आहेत. जून महिन्यात पावसाला सुरुवात होण्यापूर्वी ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी मंदिर गुरुवार पासून ९ एप्रिल ते ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली.

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे गर्दी होणार असल्याने या ठिकाणी सुविधा उपलब्ध होण्यासाठी २८८.१७ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

कुंभमेळ्यावेळी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जुन्या सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे. पायरी मार्गाचे कामदेखील सुरू आहे. सद्य:स्थितीत मुख्य सभामंडप पूर्ण उतरवून नवीन सभामंडपाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. सभामंडप बांधकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड आणि अन्य यंत्रसामग्री मंदिर परिसरात आहे. बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page