मुंबई

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार…

mumbai – बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. अखेर आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केले. पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, दोन पोटनिवडणूक महाराष्ट्रात होणार आहे. यामध्ये बारामतीकडे सर्वात जास्त लक्ष लागलं आहे. वैचारिक भूमिका म्हणून भाजपला विरोध करण्यासाठी बारामतीच्या पोटनिवडणूकीत अर्ज भरला होता. बारामती नाही तर देशभरात भाजपच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली होती. एकूण सहा अर्ज बारामतीसाठी आले होते. परंतु शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भल्या पहाटे येऊन बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली.

अजित पवार यांच्या संदर्भात सहकार्याची भूमिका घ्या अशी विनंती केली. काही जणांनी अपरिपक्व वक्तव्य केली. त्या संदर्भात कुटुंबांनी दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ही विनंती आणि सूचना दिल्या, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

त्यानंतर सर्व काँग्रेस नेतृत्व यांच्यासोबत चर्चा केली. लढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र संस्कृती आणि संवेदना म्हणून आम्ही बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेत आहोत, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page