मुंबई
आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल…

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिेच्या रोड डिपार्टमेंटच्या तक्रारीनंतर एन.एम. जोशी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शासकीय कामात अडथळा आणणे आणि जमाव जमवणे या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



