डोंबिवली
डोंबिवलीत रिक्षा चालकाने केली रिक्षा चालकाची हत्या…

Dombivli (Breaking News) – डोंबिवली पूर्वेत एका रिक्षा चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून एका रिक्षा चालकाने डोक्यात रॉड घालून एका रिक्षा चालकाची हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील भोईरवाडी, खंबालपाडा परिसरात हि घटना घडली असून, अश्विन कांबळे असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव सुनील राठोड असे आहे.
दरम्यान, टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपी सुनील राठोडला ताब्यात घेण्यात आले आहे.