चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? पवार, फडणवीस, ठाकरेंच्या गाड्या फोडा – प्रकाश आंबेडकर…
परभणी – वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय? शरद पवार, देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आता मिटकरी कुठल्या पक्षात आहेत? अजित पवार गटात आहे. जितेंद्र आव्हाड कोणत्या गटात आहेत? शरद पवार गटात आहेत. गाड्या फोडणाऱ्यांना माझं आवाहन आहे, अरे चिल्लर लोकांच्या का गाड्या फोडत आहात? या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावं देतो, त्यांच्या गाड्या फोडा. एक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, दुसरं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिसरं नाव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि चौथं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या नेत्यांच्या गाड्या फोडा. या चिल्लरफाल्लरांच्या काय गाड्या फोडता? असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.