नवी मुंबई

नवी मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त…

मुंबई – उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बजूस, स्टार वेल्डींग वर्क्सच्या समोर, तळोजे पाचनंद, तळोजे नवी मुंबई येथे कारवाई करीत 1 कोटी रूपये किंमतीचा अंमली पदार्थ गांजा जप्त केला. या कारवाईमध्ये आरिफ जाकीर शेख व परवेझ बाबुअली शेख यांच्याविरूद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये आंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे.

या गुन्ह्यातील आरोपींकडून पांढऱ्या रंगाच्या नॉयलॉन गोण्यामध्ये 414 किलो 1 कोटी 13 लाख 90 हजार रूपये किंमतीचा गांजा मिळून आला आहे. त्याचबरोबर वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एनडीपीएस (नॉर्कोटीक्स ड्रग अँड सायकोट्रॉपीक सबस्टान्सेस ॲक्ट) कायद्यान्वये जप्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page