डोंबिवलीत महिला डॉक्टरचा विनयभंग…
dombivali – डोंबिवलीतील एका सोसायटीमध्ये एका रुग्णाच्या उपचारासाठी आलेल्या महिला डॉक्टरचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. एका प्रसिद्ध फुड पार्सल कंपनीत कार्यरत असलेल्या डिलिव्हरी बॉयने हा प्रकार केला असून महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा तरुण लिफ्ट उघडताच पळून गेला. यशवंत धोत्रे असे याचे नाव असून, मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
डोंबिवली पूर्व परिसरात एका हाय प्रोफाईल सोसायटीत वास्तव्यास असलेल्या वयोवृद्ध रुग्णावर फिजिओथेरपीचे उपचार सुरु आहेत. हे उपचार करण्यासाठी मागील काही दिवसापासून एक महिला डॉक्टर रुग्णाच्या घरी येते होती. त्यावेळी हि महिला डॉक्टर सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये गेली. सहावा मजल्यावर लिफ्टचे दार उघडले. तेथे झोमॅटो बॉय दारासमोर उभा होता. त्याने लिफ्टमध्ये प्रवेश केला. दार बंद होताच त्या तरुणाने महिला डॉक्टरशी अंगलगट करुन गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला डॉक्टरने प्रतिकार केला. मात्र लिफ्टचे दार उघडताच तो पळून गेला.
यानंतर महिला डॉक्टराने मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून, झोमॅटो बॉय यशवंत धोत्रे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली.