डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा अग्नितांडव!…

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडो अमाईन्स असे या कंपनीचे नाव असून, डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मध्ये ही कंपनी असल्याची माहिती समोर आली आहे. ही कंपनी रहिवासी संकुलात आहे.

अभिनव शाळा नावाची शाळाही या दुर्घटनाग्रस्त कंपनीच्या बाजूला आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरु आहे. स्फोटांचे आवाज आल्यानं असल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

दरम्यान, डोंबिवलीत घडणारी हि काही पहिली घटना नसून, याआधी काही दिवसांपूर्वी एका  कंपनीला भीषण आग लागली होती आणि अनेकजणांचा मृत्यू झाला होता. तसेच त्या घटनेतील कित्यकजण अजूनही बेपत्ता आहेत. वारंवार अशा घटना डोंबिवलीत घडत आहे पण अजूनही प्रशासनाला जाग येत नाहीये.  सामान्य माणसांचे नाहक जीव जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page