डोंबिवली

डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्टेशन समोरील इमारतीचा स्लॅब कोसळला; केडीएमसीचे दुर्लक्ष?…  

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील ‘ग’ प्रभाग क्षेत्रातील रेल्वे स्टेशन समोरील इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. रेल्वे स्टेशन समोरील साई पूजा रेस्टोरंट आणि बार असलेल्या (सदानंद इमारत) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब दुपारच्या सुमारास कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, या इमारतीला केडीएमसीने ‘क’ दर्जा दिला होता. तसेच हि घटना पहिल्यांदा घडली नसून याआधी हि हा स्लॅब कोसळला होता. त्यावेळी २ जण जखमी झाले होते. त्यावेळी केडीएमसीने या इमारतीला खाली करण्यासाठी नोटीस बजावली होती. परंतु सावरासावरी करून त्या इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली जणू काही हि इमारत आताच उभी केली असल्याचे चित्र केडीएमसीला दाखवण्यात आले आणि केडीएमसीने देखील याची शहानिशा न करता दुर्लक्ष केले. आज पुन्हा हा स्लॅब कोसळला. सुदैवाने तेथे कोणी नसल्यामूळे मोठी जीवितहानी टळली.

हि इमारत ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी वर्दळीचा रस्ता आहे. लाखो लोक तेथून ये-जा करत असतात. शिवाय या इमारतीच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर बार आहे. तेथेही लोक येतजात असतात. रस्त्यावर फेरीवाले बसलेले असतात. याकडे केडीएमसी दुर्लक्ष का करत आहे? केडीएमसी लोकांच्या जीवाशी का खेळत आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. केडीएमसी ‘ग’ प्रभाग क्षेत्रातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तर यात सहभाग नाही ना? असे अधिकारी कर्मचारी अशा इमारतींना अभय देत आहेत का? अशी चर्चा आता सुरु आहे.

केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी याची तात्काळ दखल घेऊन सबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच इमारतीची सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.

(दरम्यान, स्लॅब कोसळल्याची माहिती ‘ग’ प्रभागाला कळविली असता तेथील कर्मचाऱ्यांनी मी निवडणुकीच्या मीटिंगमध्ये आहे माहिती घेतो आणि कळवितो असे सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून केडीएमसीला घटनेचे किती गांभीर्य आहे हे दिसून येते.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page