डोंबिवली

गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास कल्याण गुन्हे शाखेने केली अटक…

डोंबिवली – देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस विनापरवाना बेकायदेशिररित्या कब्जात बाळगणाऱ्यास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. राजू तिवारी असे याचे नाव आहे.

टिळकनगर पोलीस ठाणे हददीत डोंबिवली पूर्वच्या बीएसयुपी बिल्डींग, पाथर्ली रोडलगत, शेलार नाका, डोंबिवली पूर्व येथे एक इसम देशी बनावटीचा कट्टा विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती पोहवा दत्ताराम भोसले व पोशि गुरूनाथ जरग यांना मिळाली होती. त्यानुषंगाने व.पो.निरी. नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून राजू तिवारीला अटक केली.

त्याच्याजवळ २०,०००/- रूपये किंमतीचा १ देशी बनावटीचा कटट्टा व २००/- रूपये किंमतीचा १ जिवंत काडतूस असा एकूण २०,२००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशिररित्या मिळून आला. सदर प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, मस्के, सपोनि संदिप चव्हाण पोहवा दत्ताराम भोसले, पोहवा विश्वास माने, पोहवा किशोर पाटील, पोना दिपक महाजन, पोशि गुरूनाथ जरग यांनी केली. पुढील तपास सपोनि संदीप चव्हाण करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page