ठाणे

प्रवाशाला लुटणारे गजाआड…

भिवंडी – रिक्षामध्ये प्रवाशी म्हणून बसवून एकाला लुटणाऱ्या दोघांना कोनगाव पोलीसांनी अटक केली आहे. शेखर गोवर्धन पवार आणि मनीष भोलानाथ गुप्ता अशी या दोघांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, सिंटू मौर्य यास मानकोली येथून प्रवासी म्हणून बसवून राजनोलीकडे येत असताना टाटा अमित्रा समोर नाशिक हायवेवर आल्यावर रिक्षा बाजूला घेऊन मौर्य याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जबरीने चोरी केल्याबाबत कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नेतीवली आणि डोंबिवली भागात शोध घेऊन या दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून मोबाईल, कार, रिक्षा आणि रोख रक्कम असा एकूण ७,६३,४००/-  रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे परिमडळ ०२, भिवंडी, सहा पोलीस आयुक्त किशोर खैरनार पूर्व विभाग, भिवडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार कोनगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दिप बने, कोनगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव कुंबळे, पोहवा मधुकर घोडसरे, जगदिश पाटील, पोलीस नाईक नरेंद्र पाटिल, पोलीस शिपाई राहुल वाकसे, हेमराज पाटिल, कुशल जाधव, प्रेमत खडसर, अच्युत गायकवाड, रमाकांत साळुंखे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page