अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणारा…
डोंबिवली – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण पोलिसांनी अटक केली. प्रेम शिंदे असे याचे नाव आहे.
रत्नागिरी जिल्हयातील एका अल्पवयीन मुलीचे सुमित लोध व प्रेम शिंदे या दोघांनी अपहरण करून त्यानंतर सदर अल्पवयीन मुलीवर सुमित लोध याने प्रेम शिंदे याच्या मदतीने जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून बलात्कार केला होता.
सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ०७/२०२३ भा.दं.वि. कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (जे) (एन), ३७६ (३) १०९ सह ले.अ. बा. संरक्षण कायदा कलम ४, ६, ९ (एल) / १० प्रमाणे दाखल करण्यात आला होता. तसेच गुन्हा दाखल झाल्यापासून प्रेम शिंदे हा फरार झाला होता.
त्यानुषंगाने पोलीस गुन्हयाचा समांतर तपास करत असताना सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पथकाने उंबाली रोड, मानपाडा, डोंबिवली पूर्व येथे सापळा रचून प्रेम शिंदेला अटक करून पुढील कारवाई साठी संगमेश्वर पोलीस ठाणे, जिल्हा रत्नागिरी येथील पोलीस अधिकारी व पथकाचे ताब्यात दिले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक- ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पो.हवा. अनुप कामत, पो.हवा. विश्वास माने, पो.हवा. बापूराव जाधव, पो.ना. सचिन वानखेडे, पो.कॉ. विनोद चन्ने, पो.कॉ. विजेंद्र नवसारे यांनी केली.