kalyan

नशेसाठी कफ सिरपची तस्करी करणाऱ्या तिघांना…

कल्याण – नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कप सिरप या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. अरबाज आमिर खान अब्दुल कादिर मुस्ताक अहमद अन्सारी, गुलफाम अहमद वकील अहमद सय्यद अशी या तिघांची नावे असून, त्यांच्याकडून पोलिसांनी कफ सिरपच्या ६० बाटल्या जप्त केल्या.

बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोविंद वाडी बायपास रोडवरील सर्वोदय बिल्डिंगच्या समोर नाल्या जवळ नशेसाठी वापरण्यात येणारे कप सिरप या अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून तिघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या FEDEREX कप सिरप नावाच्या ६० बाटल्या, १ रिक्षा असा एकूण १,१०,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची यशस्वी कामगिरी सचिन गुंजाळ पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण आणि कल्याणजी घेटे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याण यांच्या मार्गर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, स.पो.निरी नवनाथ रूपवते, पोलीस हवालदार सचिन साळवी, पावशे, प्रेम बागुल, बाविस्कर, भालेराव, पो ना. कातकडे, फड, आंधळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page