बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी
डोंबिवली – पूर्वेत राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राम नगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आकाश गिरी आणि इंद्रजित यादव अशी या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एपीआर रिऍलिटी, आदीमाया इंटरप्रायजेस, व्हर्टीकल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीचे मालक बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव यांना आकाश गिरी याने मोबाईलद्वारे तु इंद्रजित यादवचे पैसे त्याला दे नाहीतर तुझी मर्डर करतो अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाणे गु.र.क्र.३९५/२०२३, भा.द.वि.क. ५०६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आकाश गिरी आणि इंद्रजित यादवला अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण, सुनिल कुराडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, नितीन गिते, व.पो.निरीक्षक डोंबिवली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि केशव हासगुळे, पो. हवा विशाल वाघ, पो.हवा सुनिल भणगे यांनी केली.