डोंबिवली
डोंबिवलीत ठाकरे गटाचा मूक मोर्चा…

डोंबिवली – ठाकरे गटाकडून मूक मोर्चा काढण्यात आला. ‘होऊ द्या चर्चा’ चे कार्यक्रम रद्द करायला लावल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.
याबाबत वृत्त असे आहे कि, शिवसेना ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षातर्फे ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना अचानक पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी रद्द केली.

याबाबत डोंबिवली मधील तिन्ही पोलीस ठाण्यातून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. उल्हासनगर येथील कार्यक्रमाचे कारण देत पुढील कार्यक्रमांच्या परवानग्या रद्द केल्याचे पोलिसांनी या नोटीस मध्ये म्हटले आहे. त्यामुळे परवानगी नाकारली म्हणून ठाकरे गटाकडून मूक मोर्चा काढण्यात आला.