महाराष्ट्र
अजित पवारांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी…

नाशिक – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

कांदा आणि टोमॅटोला भाव मिळत नसल्याने दिंडोरी-कळवण रस्त्यावर कांदा-टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवत कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकले, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अजित पवार यांना काळे झेंडेही दाखवले.
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले.