देश
पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर…

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

मध्यप्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर, मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबरला रोजी होणार आहे. दरम्यान, या पाच राज्यात ६७९ जागांवर मतदान होणार आहे.