मित्रावर गोळी झाडणारा मित्र अटकेत…
कल्याण – खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने परिसरात मित्रानेच मित्रावर गोळीबार केला असल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता गोळी झाडणाऱ्या मित्राला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. उमेश प्रमोद खानविलकर असे अटक करण्यात आलेल्या मित्राचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, सुशील मोहंतो हा आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत होता, तेव्हा अचानक त्यातील एका मित्राने त्याच्यावर गोळी झाडली होती. आणि हि गोळी सुशीलने हात आडवा केल्याने त्याच्या हाताचा पंजा फाडून त्याच्यात तोंडात गेली आणि त्याची जीभ फाडून हि गोळी त्याच्या घशामध्ये अडकली. या घटनेनंतर सुशीलचा मित्र उमेश फरार झाला होता.
याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला होता. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे उमेशला शहाड प. रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अटक केली. तसेच त्याच्याकडून गुन्हा करताना वापरलेले हत्यार १ गावठी अनावटीचे पिस्टल, त्यात १ जिवंत काडतुस तसेच मोबाईल, पॅन कार्ड असा एकूण २०,२५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पो निरी. राहुल मस्के व त्याचे सहकारी पोउनि संजय माळी, पो.हवा. किशोर पाटील, रमाकांत पाटील, अनुप कामत, प्रशांत वानखेडे, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, उल्हास खंडारे, विलास कडू, पो. ना दिपक महाजन, सचिन वानखेडे, पोशि गुरूनाथ जस्ग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, उमेश जाधव, रविंद्र लांडगे, विजेंद्र नवसारे सर्व नेम, गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण यांनी केली आहे.