महाराष्ट्र

लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे – मंडळ अधिकाऱ्याला 50 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांनी रंगेहात पकडले. सुधीर बोंबे असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना गट न.129 मधील 0.53.10 आर क्षेत्रफळाची मौजे मालेगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या जमिनीच्या विक्री व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासंदर्भात जमीन मालकाकडून अधिकार पत्र प्राप्त आहे. सदर मिळकत खरेदी विक्री करणारे दोघे आदिवासी असल्याने मिळकत हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांना पाठवायचा अहवाल सकारात्मक पाठवण्यासाठी बोंबे यांनी तक्रारदार यांचेकडे 70,000/- रुपयाची मागणी केली होती.

दरम्यान, बोंबे यांनी तक्रारदार यांच्याशी झालेल्या संभाषणा 60,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 50,000/- रुपये लाच रक्कम घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page