नवी दिल्ली

उज्ज्वला योजनेच्या अनुदानात…

नवी दिल्ली – उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना ६०० रुपयात घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे.

याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी कमी केले होते. ही किंमत १,१०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली. त्यानंतर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना गॅस मिळू लागला.

आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ६०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page