डोंबिवली

घरफोडी करणारी महिला अटकेत…

डोंबिवली – बनावट चावीच्या आधारे घरफोडी करणा-या एका महिलेला डोंबिवली पोलिसांनी अटक करून २,५५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. सीमा उर्फ नेहा ढोलम असे या महिलेचे नाव आहे.

फिर्यादी या घरात नसताना त्यांच्या घरी यापूर्वी घरकाम करणारी महिला सिमा उर्फ नेहा ढोलम हिने घराची डुप्लीकेट चावी तयार करून घरातील २,९०,०००/- रु. रोख रक्कम आणि दागीने चोरी करून नेली असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सिमा उर्फ नेहा ढोलम हिला अटक करून तिच्याकडून एकूण २,५५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३. कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल वाघ, पोहवा कुरणे, पोहवा प्रशांत सरनाईक, पोअ पोटे, पोअ सांगळे, मपोहवा जाधव, मपोशि  राजपुत, पो.ना. दिलीप कोती यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page