kalyan

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या…

kalyan – कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर मुलगी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यानंतर तिचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर तिची हत्या करण्यात आली.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मुख्य आरोपीसह ३ जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपीचे नाव विशाल गवळी आहे तर यासबोतच त्याची बायको आणि एका रिक्षावाल्याचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हि मुलगी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी कल्याण पूर्वे परिसरातून विशाल गवळीने या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात फेकून दिला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान, विशाल गवळी हा शेगावमध्ये असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून विशाल गवळीला अटक केली.

दरम्यान, गवळी हा कल्याण परिसरातील गुंड असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर पोक्सोसह विनयभंगाचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. बलात्कार आणि पोक्सोसारख्या गुन्हात गवळी तडीपार देखील होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page