ठाणे

अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई…

thane – महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम, 2011 दि.22 मार्च 2011 मधील नियम 5 नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंबंधीत स्कूल बस धोरणानुसार मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात दि.18,19 व 20 जून 2025 या तीन दिवसांमध्ये अवैधरित्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 121 वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 व शालेय स्कूल बस नियमावली 2011 नुसार थेट कारवाई करण्यात आली आहे.

या तपासणीमध्ये वाहनांच्या सर्व वैध कागदपत्रास महाराष्ट्र वाहन (स्कुलबसकरिता विनियम) नियम 2011 मध्ये विहित केलेल्या सुरक्षिततेच्या शालेय परवाना, विद्यार्थी संख्या, चालकाचे वैध संवर्गातील अनुज्ञप्ती व बॅज, महिला सहवर्ती तपासणी करण्यात आली.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय प्रथम सत्र सुरु होण्याच्या सुरुवातीस शालेय वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येते, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page