ठाणे

चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, दरोडा, घरफोडी करणारे सराईत गजाआड…

thane – चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या इराणी आणि शिकलगार टोळीच्या एकूण चार सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे शाखेने अटक करुन त्यांच्याकडून एकूण ३६,२९,७२५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसिम काला, कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी, शिवासिंग अमिरसिंग बावरी आणि पुनमकौर अमिरसिंग बावरी अशी यांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग, वाहन चोरी आणि घरफोडीचे गुन्हे घडले होते, या गुन्हयांचा कल्याण गुन्हे शाखा तपास करत होती. त्याअनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर चौघांना अटक करून दरोडा १ गुन्हा, चेन स्नॅचिंग २० गुन्हे, मोटार वाहन चोरी ५ गुन्हे, घरफोडी चोरी ३ गुन्हे असे एकूण २९ गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे दागिने, ६ चारचाकी गाड्या असा एकूण ३६,२९,७२५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहा पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि/सर्जेराव पाटील, सपोनि/संतोष उगलमुगले, पोउपनि/किरण भिसे, पोउपनि/विनोद पाटील, सापोउपनि/दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, सुधीर कदम, सचिन भालेराव, वसंत चौरे, पांडुरंग भांगरे, विजय जिरे, विलास कडु, अनुप कामत, प्रशात वानखेडे, उल्हास खंडारे, अदिक जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मंगल गावित, बालक अमोल बोरकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page